भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

तंव धांउनी गेला चरणीं लागला । देवा तूं दाखविला ठेवा माझ्या मायबापाचा ॥१॥ जाऊन तो धरीन न सोडीं मी आतां । जे मज पंढरिनाथा ग्वाही दिधली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव निजभुवनीं सुखें पंढरीनाथ । नित्य जीवीं आर्त निजहक्तांचे ॥१॥ कृपेचा वारेसु होता देवापोटीं । तेचि करी गोष्ट रुक्माईसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनियां वदला । म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया स्वरूपाचा ॥१॥ तो तूं प्रगट श्रीरंगा । येऊनि आमुच्या लोभा । स्थिर राहूनि चंद्रभागा । भक्तजनां तारीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव पुसती होय माता । तुम्हीं झणें खेद करा चित्ता । तरी ज्ञानासारिखा कां आतां । समाधीसी बैसवितां ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी । प्रतिपादिले वेदीं जे जे धर्म ॥१॥ ते ते आचरावे विहित क्रियाकर्म । जें जें वर्णाश्रमें आलें जया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव म्हणती नारदमुनि परियेसी वो माते । सांगेन मी तूतें सत्य मानी ॥१॥ हा निर्विकल्प देव येतसे रुपा । करावया कृपा भक्तजनां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारे जाणवीते ॥१॥ केळाच्या पाठीवर ठेविला दोडका । तोहि ह्मणे विका तेणें मोलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥ तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तापीचिये तीरीं महत्‌ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन ॥१॥ वद्य वैशाख मास दशमी निर्मळ । उष्णकाळ फार तापतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तारीं मज आतां रखुमाईच्या कांता । पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनि बोलताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥ कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥ धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव