भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले

tinhi dev jaise parabrahminche thase | jagin surya jaise prakashale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥ धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥ उपजतांचि ज्ञानी हें वर्म जाणौनि । आले लोटांगणीं चांगदेव ॥३॥ प्रत्यक्ष पैठणीं भटीम केला वाद । बोलविला वेद म्हैसीपुत्रा ॥४॥ संस्कृताच्या सोडोनियां गांठी । केलीसे मराठी गीता देवी ॥५॥ नामा म्हणे सर्व सुख लाहिजे । एक वेळां जाईजे अळकावती ॥६॥