भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारीं मज आतां रखुमाईच्या कांता । पंढरीच्या नाथा मायबापा

tarin maj atan rakhumaichya kanta | pandharichya natha mayabapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तारीं मज आतां रखुमाईच्या कांता । पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनि बोलताती ॥२॥ त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास । धरिली तुझी कास पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकीं आऊ म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें ॥४॥