भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचें ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । नाम तें पावन श्रीरामाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥ म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे ॥१॥ तैसें पायाळपणें पुडलीक धन्य । दाविलें निधान पंढरीसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥ नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटीं कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥ ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥ जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥ तयां म्हणताती देव । विसरुनि देवाधिदेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां कैसें पालटलें मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥ आनंदें जनार्दना लागलों मी पायां । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥ जाऊनि धरितो माझें म्हणोनियां । परी तें वायां जाती सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्तीं माझें ॥१॥ संताचें संगतीं लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला विठ्ठल देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ