भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठीं सदगद

payarin ghalin mithi | daten kanthin sadagad

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठीं सदगद ॥१॥ वाहेन टाळी नाचेन रंगीं । दुजें संगीं नका कांहीं ॥२॥ पायवणीं वंदीन माथा । निवारेल चिंता मग सर्व ॥३॥ एका जनार्दनीं दान । द्यावे दोष गुण न पाहा ॥४॥