पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो
paha kaisa devacha navalavo | pahe tikade avagha devo
पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥ पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
paha kaisa devacha navalavo | pahe tikade avagha devo
पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥ पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥
paha kaisi navalachi thev | svayamev dehi dekhila dev
पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥ नाहीं जप तप अनुष्ठान । नाहीं केलें इंद्रियाचें दमन ॥२॥
paha paha usan baisalase kal | bharali te vel na chuke mag
पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग ॥१॥ सर्वही संबंधीं असतां जवळी । नेईल तात्काळीं तुजलागीं ॥२॥
paha paha viththalamukh | hare janmamaran duhkh
पहा पहा विठ्ठलमुख । हरे जन्ममरण दुःख ॥१॥ पहातां राउळाची ध्वजा । पुर्वज उद्धरती सहजा ॥२॥
paha ho paha vrudanvanin anandu | krida kari yashodecha bal mukund
पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥ गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥
pahatan santasamuday | bhukti mukti tethen dev
पहातां संतसमुदाय । भुक्ति मुक्ति तेथें देव ॥१॥ जातां लोटांगणीं भावें । ब्रह्माज्ञान अंगं पावें ॥२॥
pahala to din harikhacha amhan | sarvabhutin abhinna sada dekhon shrirama
पहाला तो दीन हरिखाचा आम्हां । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखों श्रीरामा ॥१॥ काय सांगु गोविंदा तुझीं आवडी । जनीं वनीं नयनीं नीत नवी गोडी ॥२॥
pahalen re mana pahalen re | buddhibodhen indriyan sam jalen ren
पहालें रे मना पहालें रे । बुद्धिबोधें इंद्रियां सम जालें रें ॥१॥ नयनीं पहातां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥२॥
pahavaya gelon dev | to michi svayamev
पहावया गेलों देव । तो मीची स्वयमेव ॥१॥ आतां पाहणेंचि नाहीं । देव भरला हृदयीं ॥२॥
paula pauli chintavi mauli | vithai sauli adi anti
पाउला पाउली चिंतावी माउली । विठाई साउली आदि अंती ॥१॥ नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि देव हाति मग ॥२॥
paule gojirin dhyan vite miravale | shobhate tanhule yashodache
पाउले गोजिरीं ध्यान विटे मिरवले । शोभते तान्हुले यशोदचे ॥१॥ न कळे पुरणां शास्त्रादि साम्यता ॥ तो हरी तत्त्वतां पढरीये ॥२॥
panghurala ghongade kalen | vrudanvanin gopala majin khele
पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे । काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥
panch panchacha miloni melu | sadashiv mhanati amangalu
पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥ कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥
pancha janachen | anilen jayachen | miravan tayachen | kon sukh
पांचा जाणाचें । आणिलें जयाचें । मिरवण तयाचें । कोण सुख ॥१॥ नवल विस्मयो कैसा । देखत देखत झांसा । मृगजळाची आशा । केवीं आहे ॥२॥
paji premapanha launiyan soi | punha to na govin yerajharin
पाजी प्रेमपान्हा लाऊनियां सोई । पुन्हा तो न गोवीं येरझारीं ॥१॥ येरझार दारीं घातलासे चिरा । ठेविलेंसे स्थिरा चरणाजवळीं ॥२॥
pathavuni dut anavilen tisi | vismayo sarvansi hot jala
पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला ॥१॥ साशंकित राजा लावीं म्हणे हात । विमान क्षणांत उचलिलें ॥२॥
pandavanche gruhin jan | asankhya jevile bramhan | dharmachen vismit man | sankhyelagin
पांडवांचे गृहीं जाण । असंख्य जेविले ब्राम्हण । धर्माचें विस्मित मन । संख्येलागीं ॥१॥ तें कळलें वैकुंठा । निर्मिली तेव्हां घंटा । तेव्हां ते गर्जे देखा । संख्या नाद ॥२॥
paniyacha masa jala | namarupa nahin ala
पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला ॥१॥ तें पूर्वीच पाणी आहे । तेथें पारधी साधील काय ॥२॥
patala re bhavagajapanchanan | nirasuniyan jan jhala janardan
पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन ॥१॥ नाभी नाभी नाभीसी काह्मा । नाथिला संसार लटकी ही माया ॥२॥
panthastha gharasi ala | pratahkalin uthoni gela
पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥१॥ तैसें असावें संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥