भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाजी प्रेमपान्हा लाऊनियां सोई । पुन्हा तो न गोवीं येरझारीं

paji premapanha launiyan soi | punha to na govin yerajharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाजी प्रेमपान्हा लाऊनियां सोई । पुन्हा तो न गोवीं येरझारीं ॥१॥ येरझार दारीं घातलासे चिरा । ठेविलेंसे स्थिरा चरणाजवळीं ॥२॥ एका जनार्दनीं केलोंसे मोकळा । संतापायीं लळा लाऊनियां ॥३॥