भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा

palatoni jati gharasi tatkal | khel to akal sarva tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥ निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरित खेळताती ॥३॥ न कळे लाघव करी ऐशीं चोरी । एका जनार्दनी हरीं गोकुळांत ॥४॥