भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही

payanvari thevitan bhal | geli talamal sakalahi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥ बैसलें रुप डोळां आधीं । गेली उपाधी सकळ ॥२॥ एका जनार्दनीं मंगल जाला । अवघा भरला हृदयीं ॥३॥