भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं

paya shodhoniyan bandhitati ghar | aisen ya dustar naradehin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥ म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥ संपत्ति देखोनि गिवसिती तयासी । माझें माझें म्हणती रांडापोरें ॥३॥ चाले बरवा धंदा । बहिणी म्हणती दादा । आलिया दरिद्रबाधा पळुनी जाती ॥४॥ जनार्दनाचा एका करितसे विनंती । संतसंगें चित्तीं जीवीं धरा ॥५॥