भजनी मालिका
← भजनांकडे परत

पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा

par nahin jayachya guna | to ubha shripandharicha rana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥ नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटीं कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥ न म्हणे तया कोणते बोल । उगा राहिला न बोले बोल ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आस । धरुनी उभा तिष्ठे जगदीश ॥४॥