भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे

payalasi anjan asaven dolan | mag dhanacha kohala hatan lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे ॥१॥ तैसें पायाळपणें पुडलीक धन्य । दाविलें निधान पंढरीसी ॥२॥ एका जनार्दनीं चहुं वाचांवेगळा। परापश्यंतीसी कळा न कळेची ॥३॥