भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

आनंदाच्या ताटीं अमृताची वाटी । विवेकतारुं घोटी रसनाबळें ॥१॥ तें हें रुपडें रुपस विठ्ठल । पुंडलिकें बहु साल प्रार्थियलें ॥ध्रु०॥

आनु नेणें कांहीं । विठ्ठलु स्मरें देहभावीं ॥१॥ पुंडलिका हें चिंतन । म्हणोनि विटेवरि हें ब्रह्म ॥२॥

आम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे । पापें बारा ताटा पळती बापडिरे ॥१॥ पंढरपुरीचे कापडिरे । उत्तरपंथीचे कापडिरे ॥२॥