भजनी मालिका
← भजनांकडे परत

आप आपीं माये तेजी तेज समाये

ap apin maye teji tej samaye

आप आपीं माये तेजी तेज समाये । पवनगे माये पृथ्वी जाये ॥१॥ हंस कोठें गेला तूं पाहो विसरला । भ्रमेंचि भुलला कोई शब्दें ॥२॥ सांडी तू रे जाती होई रे विजाती । येणें रुपें समाप्ती प्रपंचाची ॥३॥ ज्ञानदेवा घर विठ्ठल आचार । वेगीं परंपार हंसपावे ॥४॥