भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें कांही न विचारितां धन

apulen kanhi na vicharitan dhan

आपुलें कांही न विचारितां धन । निगुणासी ऋण देऊं गेलें ॥१॥ थिवें होतें तें निध सांठविलें । विश्वासें घेतलें लक्ष वित्त ॥२॥ ऐसा हा निवृत्तिप्रसादु फ़ळासि आला । निर्फ़ळ केला मज निर्गुणाकारें ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु साच म्हणोनि निघालों । तेणें नेऊनि घातलों निरंजनी ॥४॥