भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदलें वैष्णव गर्जती नामें

anandalen vaishnav garjati namen

आनंदलें वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवनें भरलीं परब्रह्में ॥१॥ नरोहरि हरि हरि नारायणा । सनकसनंदनमुनिजनवंदन ॥२॥ गातां गातां नाचतां । प्रेमें उल्हासें । चराचरींचे दोष नाशियलें अनायासें ॥३॥ हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरी । तयातें देखोनि हरि चार्‍ही बाह्या पसरी ॥४॥ अंघ्रिरुणु ज्याचा उध्दरितो पतिता । प्राकृत वाणी केविं वानूं हरिभक्ता ॥५॥ तीर्थे पावन जिहीं धर्म लेला घडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥ मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहालें ॥७॥ बापरखुमादेविवरा पढियंती जीया तनु । तया संताचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥