भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलाडु आडु पालाडु आडु

aladu adu paladu adu

आलाडु आडु पालाडु आडु मध्यें वाहे पाणी । तिही संधी खेळु मांडिला सितादेवि राणी ॥१॥ सुखाति चांदिणें राती । बहुतें खेळती येकु देखे ॥२॥ खेळतां खेळतां नवल पाहे देखणा खीर खाये । सांपडे ते कोण्हा न संगे भोग्या शिवोन राहे ॥३॥ भोगिया सिवोन उतरला डायीं । ज्ञानदेव सांगे निवृत्तीच्या पायीं ॥४॥