भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचिया देवा नाही नाम गुण

amuchiya deva nahi nam gun

आमुचिया देवा नाही नाम गुण । नाही स्थानमान रुपरेखा ॥१॥ नित्य निराकारीं आमचें भजन । अहंब्रह्म पूर्ण निजध्यासें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे आमिष जोडिलें । निरंजनी केला वास आम्हीं ॥३॥