भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधाराचक्रीं निवणें मांडिलें कैसां

adharachakrin nivanen mandilen kaisan

आधाराचक्रीं निवणें मांडिलें कैसां डेरिया उपचार केला । तिन्ही संयोग गोमटें घुसळण रविबजो मेरु वो । तेणें आणलें समयातें तेथें वरुवचन लाधलें निरुतें वो ॥१॥ विद्यापात्रें गौळणी मंथन करुं ब्रह्मज्ञानी वो । चाल निज निज पंथें कैसें नवनीत आणिलेंसे हाता वो ॥ध्रु०॥ गुरुउपदेशें रवि धरी अधऊर्ध्व मांजरी पांचै प्राण मंथन केलें निरुतेंवो । ईडा पिंगळा कुंडलणीया ब्रह्मसूत्र दोरु तो आणिया वो । उभी राहोनि गगनीं अनुहातें अंबर गर्जे वो ॥२॥ मन एकतत्त्वीं करी वो । चित्त दृढ धरी वो । तयामाजि न विसंबे कांहा । ऐसा गोरसु चोखटु । मोलेंविण येतसे फ़ुकटु । यासि न वचे कांहीं । चित्त बैसे समरसें ठाईवो ॥३॥ गौळणी गोमटी हातिं कसवटी क्षीरा नीरा निवाडा करी वो । मेघडंबर न विसंबे तेथें घुसळितां थेंबु जो नुसळे वो । जन पाडलेसे धंदा गोरसा गोडी नेणती अंधे वो ॥४॥ काया हे नगरी गौळणी गोरसु पुकारी नवहि दारवंटे सांडुनि वो । दशवेद्वारीं पातली कैसी विनटली गोविंदींवो । दंभ विकरा जाला अधर्म धर्म लोपला वो । अवघी काया झांकुळली बापरखुमादेविवरा विठ्ठलीं वो ॥५॥