भजनी मालिका

भजने

हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥ तैसोंचि येथें मृगाअंगीं सत्त्व । वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिश्चंद्रराजा होता सत्त्वगुणी । वाहातसे पाणी डोंबा-घरीं ॥१॥ सत्य पतिव्रता तारामति राणी । राहिली भोगोनी काया- क्लेश ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिस श्रवणीं ध्या वो नित्य तुझी । ठसावेल ध्यानीं अवघा राम जनींवनीं ॥१॥ नयनीं सखा पहा कृष्ण न्याहाळुनी । प्रकाशलें तेज रवि गेला लपोनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥ तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी ॥१॥ यांवरी गोपाळ आनंदें नाचती । भूषणें श्रीपती शोभायमान ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥ वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरुं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥ योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरी गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम