भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिविण भावो न धरावा पोटी

harivin bhavo na dharava poti

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरिविण भावो न धरावा पोटी । सर्वभावे सृष्टि एकातत्त्वे ॥१॥ तत्त्वता श्रीहरि सर्वाघटी आहे । उभारोनि बाहे वेद बोले ।॥२॥ हरिविण नाही जीवशिव पाही । शिवाच्या हो देही आत्मा हरि ॥३॥ सोपान म्हणे हरिविण नाही तत्व । हरि हाचि सर्वत्र सर्वी वसे ॥४॥