भजनी मालिका

भजने

हरिकथा परिसोनि जरी देखसी दोष । भुजंगा तेंचि परतले विष ॥१॥ हरिनाम ऐकतां जरी न वाटे सुख । अंतरीं तुं देख पाप आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिकथा श्रवण श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥१॥ तीर्थाचें सुख चरणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिकिर्तन नामोच्चर । जे नर करिती वारंवार । तया नाही संसार । ब्रह्मादि देव वंदिती ॥१॥ कीर्तनमहिमा नारदु । जाणतसे परमानंदु । जालासे सर्वां बंधु । देवा असुर मानवां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा । द्वंद्वाचा रगडा तेणें केला ॥१॥ कोरडिया काष्ठीं प्रगटले हरी । म्हणवोनि नृत्य करी तयापुढें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिखाची गुढी बोधावा आला । अहंकार गर्जतु अविवेकु मारिला ॥१॥ संतोषें विवेक आपाआपणिया विसरला । लाजुनी महाहारुष आनंदासी गेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिचिया दासां दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरि मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिदासपणें उभवीला ध्वज । परि तें वर्मबीज न क-ळेची ॥१॥ काय करूं देवा जळो याची बुद्धि । जोंवरी नाहीम शुद्धि परलोकाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा । नोहे तेथें बाधा विषयाची ॥१॥ वेदशास्त्र देती ग्वाही । पुराणे तोहि बोलती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष । श्रवण स्मरण भक्ति तेणें पडली वोस ॥१॥ हरिनामाचेनि बळे करिसी अदर्ध । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहें कर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्रवणी । जाईन लोटांगणीं तेथवरी ॥१॥ माझे सखे अवघे वैष्णवजन । त्यांचें मज दर्शन कैं होईल ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भुस दृष्टीपुढें ॥१॥ नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ