भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनाम पाठ हाचि भाव । हरी हरी हाचि देव

harinam path hachi bhav | hari hari hachi dev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिनाम पाठ हाचि भाव । हरी हरी हाचि देव । हरिविण न फिटे संदेह । सर्व जिवांचा जाण पां ॥१॥ हरितत्त्व ज्याचे देहीं । तोचि तरला येथें पाही । हरिविण या डोहीं । भवसागर कैसा तरेल ॥२॥ रामकृष्ण वासुदेवा । हाचि सर्व जिवांचा विसावा । येथें पोकारुनियां धांवा । विठ्ठलनाम उच्चारी ॥३॥ नामा जपे ह्रदयीम सदा । रामकृष्ण हाचि धंदा । हरिराम परमानंदा । हाचि जप जपतसे ॥४॥