भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या

harichandrarajane pachari olakhilya

रचनाकार: संत संताजी · अभंग
हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या । हाकलुनि दिल्या घरातुनी ।। १ ।। अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी । गोरोबानी आणि तुकारामजिनी ।।२।। संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी । सद्गुरुवांचोनी ओळखिना कोणी ।।३।।