भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भुस दृष्टीपुढें

harinamamrut sevi savakash | moksha tyache bhus drushtipudhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भुस दृष्टीपुढें ॥१॥ नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥ वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैंचा ॥३॥ एका तासामाजीं कोटीं वेळां सृष्टी । होती जाती दृष्टी पाहे तोची ॥४॥ एका जानर्दनीं ऐसें किती झाले । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥