भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्रवणी । जाईन लोटांगणीं तेथवरी

harinamacha dhvani aikoni shravani | jain lotanganin tethavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्रवणी । जाईन लोटांगणीं तेथवरी ॥१॥ माझे सखे अवघे वैष्णवजन । त्यांचें मज दर्शन कैं होईल ॥२॥ एक उभे गाती एक बैसुनी ऐकती । ह्रदयीं आलिंगिती गोपिनाथू ॥३॥ ऐशियांचे संगतीं आहे बाप माझा । विनवितो विठा सहजा नामयाचा ॥४॥