भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिविण व्यर्थ आचार समर्थ

harivin vyartha achar samartha

हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेंचि हेत अरे जना ॥ १ ॥ तें रूप पंढरी पुंडलिकसंगे । एका नामें पांग पाश तोडी ॥ २ ॥ सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण । वेदमत्तें खुण ऐसी असे ॥ ३ ॥ निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद । नाहीं भिन्न भेद विश्वीं इये ॥ ४ ॥