भजनी मालिका

भजने

सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन किडा ॥१॥ ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥ साधन हेंचि साधी तोडी तूं उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा ॥१॥ अहो स्वामी तुकयादेवा । यावरी न करावा अव्हेर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सैंध दाटली अक्षरें । माप नव्हें पुरें । केली माझीया दातारें । अतिवृष्टी कृपेची ॥१॥ लिहितां न पुरे दिवसराती । वाढविला विस्तार तो मती । जैसे क्षीराब्धीवरीं येती । तरंग मिरविती असंख्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥ आपणा आपण जाय सतीं जैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं ॥१॥ हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण ॥१॥ अंतरापासूनि नसतां विवेक । निभ्रांत चकट आशावटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोडविलीं ऐसी बहुतें आयकें । भूतळीं पातकें तरलीं नामें ॥१॥ बोलियेले संत पुराणीं व्याख्यानें । तारिले चिंतनें महापापी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा