भजनी मालिका

भजने

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥ देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी ॥१॥ विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भृकुटीं । टिळक लल्लाटीं केशराचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें ॥१॥ कनक कळस घेऊनि सत्यभामा आली । आपोशन घाली देवराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुहास्य वदन तुटती तारें । पाउलें गोजिरीं विटेवरीं ॥१॥ कटावरीं ठेविले हात । आयुधें मंडित शंखचक्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥ तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी । मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं ॥१॥ वेंघ ऐशावरी घेऊनि सवें हरि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥ माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥ क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे । क्षुधेचे वळसे इतरांसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी ॥१॥ तेवीं हा पंढरीश परमात्मा । सांडूं नेणे आपला महिमा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥ भूतांचा मत्सर नाहीं तेथें द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी ॥१॥ पतिव्रता कांता नाम तें चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥

रचनाकार: संत नामदेव