भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली

suvarchyanamen svargichi devangana | brahmashapen jan ghari jali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥ श्रूंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥ तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥ कैकेई रुसली तेथें विघ्न जालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥ एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें जाली कथा श्रवण करा ॥६॥