भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न देखोनि

surya prakashacha nenechi mahima | ratrichiya tama na dekhoni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥ क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे । क्षुधेचे वळसे इतरांसी ॥२॥ कल्पतरु नेणें औदार्य आपुलें । दैन्यचि देखिलें नाहीं तेणें ॥३॥ अमृता नाठवे अमत्व कैसेंही । मृत्यूचि त्या नाहीं म्हणोनियां ॥४॥ कामधेनु नेणें कामनेचा भोस । अपूर्णता तीस नातळतां ॥५॥ निळा म्हणे तैसा तुम्ही पांडुरंगा । नेणांचि वियोगा व्यापकपणें ॥६॥