भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुवेळेची शेज आवेळे घातली

suvelechi shej avele ghatali

सुवेळेची शेज आवेळे घातली । निवृत्ति मोहिली निसंदेह ॥१॥ मोह न खुंटले ममते तुटलें । एकरसी भरलें तत्त्वीं तत्त्व ॥२॥ प्रपंचाचे घरीं दिसतें कारण । अवघे निराकारण तत्त्वीं तत्त्वमय ॥३॥ बापरखुमादेविवर त्रिपुटीं न दिसें । रसीं सर भासे ह्रदय दीपीं ॥४॥