भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण

songachen vairagya anartha hen mul | asha ten keval mithya jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण ॥१॥ अंतरापासूनि नसतां विवेक । निभ्रांत चकट आशावटी ॥२॥ राजस तामस करोनियां गोळे । होताति आंधळे दाटोनियां ॥३॥ नामा ह्मणे ऐशा उदंड उपायें । विठोबाचे पाय अंतरिती ॥४॥