भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन किडा

sevin uchchhishta lolen anganin | vaishnavan charanin hoin kida

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन किडा ॥१॥ ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥ त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥२॥ तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥