भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं

soire dhaire amhin santajan | tayavin chintan an nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं ॥१॥ हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाहीं ॥२॥ हेंचि माझे कर्म हाचि माझा धर्म । वाउगाचि श्रम न करी दुजा ॥३॥ हेंचि माझे ज्ञान हेंचि माझे विज्ञान । संताविन शरण न जाय कोणा ॥४॥ एका जनार्दनीं हा माझा निश्चय । वंदिन मी पाय सर्वभावें ॥५॥