भजनी मालिका

भजने

भयभित झाले तेव्हा ग्रामवासी। लावियेल्या वेशी गावाचिया॥ ग्रामवासियांनी लावियेले द्वार। करी विचार सुभेदार तेव्हा ॥

रचनाकार: संत जगमित्र

भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेचीन ॥१॥ समर्पीलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भरला तो हावे म्हणे माझें माझें । वाहतसें ओझें संसाराचें ॥१॥ कुंथत कुंथत वेरझारा करी । खराचीये परी पृष्ठीं वाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट । चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥ सुख दुःख तुज देईन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भलते वेळे भलतेंचि करी । निर्भीड सर्वदा अंतरीं ॥१॥ न म्हणे कर्म हें निषिध्द । आलें मना तेंचि शुध्द ॥२॥

रचनाकार: संत निळोबा