भजनी मालिका
← भजनांकडे परत

भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का

bhala bhala pundalika | tujhya bhavarthacha shikka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥ भलें घालूनियां कोडें । परब्रम्हा दारापुढें ॥२॥ घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥ जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥