भजनी मालिका
← भजनांकडे परत

भरला तो हावे म्हणे माझें माझें । वाहतसें ओझें संसाराचें

bharala to have mhane majhen majhen | vahatasen ojhen sansarachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भरला तो हावे म्हणे माझें माझें । वाहतसें ओझें संसाराचें ॥१॥ कुंथत कुंथत वेरझारा करी । खराचीये परी पृष्ठीं वाहे ॥२॥ न मिळेचि अन्न बहुत आपदा । परी त्या गोविंदा स्मरेचिना ॥३॥ ऐसे जन्मोनियां दास संसाराचे । एका जनार्दनीं त्याचें तोंड काळें ॥४॥