भजनी मालिका
← भजनांकडे परत

भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें

bhay hoten amhipanen | pathi yenen ghatalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥ अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥ समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥ तुका म्हणें नारायणें । केलें जिणें सुखाचें ॥३॥