भजनी मालिका
← भजनांकडे परत

भय हरीजनीं । कांहीं न धरावें मनीं

bhay harijanin | kanhin na dharaven manin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भय हरीजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥ नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥ चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥ तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥