भजनी मालिका

भजने

पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा ह कळला साच भाव ॥१॥ नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठवितां सुख वाटे ॥ध्रु.॥ धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवास ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पाळोनियां मोठे केले । त्यासी बोले ओळखी ॥१॥ जवळोनि नवजे दुरी ।लाड करी कवतुक ॥ध्रु.॥ खून उभा विटेवर । काटींकर ठेउनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥ जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥ जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो ॥१॥ देखिला दंडक्षेत्रवासी जन । प्रात:काळीं प्रश्न करिती तीर्थी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानीं । विटे सम जोडुनि पदांबुजें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलों हा देह कागटाळी न्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम