भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें

pavala prasad atan vitoni javen | apala to shram kalon yetase jiven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥ तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष हारावया पीडा ॥२॥ तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥३॥