भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा

pavalon pandhari vaikunthabhavan | dhanya aji din soniyacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥ पावलों पंढरी क्षेमआळींगनीं । संत या सज्जनीं निवविलो ॥२॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥ पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥