भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावया छंदे तल्लीन गोविंदें

pavaya chhande tallin govinden

पावया छंदे तल्लीन गोविंदें । नाचती आनंदे गोपाळ कैसे ॥१॥ यमुनेच्या तीरीं गाई चारी हरी । गोपाळ गजरीं आनंदले ॥ध्रु०॥ ठायीं ठायीं मातु पेंधा पैं नाचतु । वाकुल्या दावितु हरी छंदें ॥२॥ ठाई ठाती उभ्या विसरल्या माया । हाकितु लवलाह्या कृष्णहरी ॥३॥ ज्ञानदेवाजिवीं कृष्णचिरंजिवी । गोपाळ रंजवी प्रेमभक्तां ॥४॥