भजनी मालिका

भजने

कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा । मान ईं सोज्वळा वर्णूं हरीचा ॥१॥ वृंदावनीं वेणू वाजे रुणुझुणू । वेध तनुमनु गोपाळांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कोटिशा आदित्य गोठे एके ठायीं । तेजें दिशा दाही उजळल्या ॥१॥ घाबरा होवोनी वसुदेव पाहे । ह्लदयीं आश्चर्य करी-तसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥ हेळु लोपला तेजें जें देखतां मन निवे । दरुशनें भागलें हेवा करता गे गाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी कंदर्पांच्या श्रेणीं । कुर्वडींतक जनार्दनीं ॥१॥ बरवा जनार्दनीं जनीं । पाहतां तनुमन भुलवणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया ॥१॥ कोण तुज सोडी कोण तुज सोडी । पडेल जेव्हा बेडी पायीं रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी जन्म आम्हीं करूं हरिकथा । कर्मकांड माथां धरूनियां ॥१॥ ऐहिकादि कर्में करुनी सर्वदा । भजो जी गोविंदा निरंतर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥ सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥ मग याशोदेपाशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥ न करावी सांडी आतां टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥ कोठें गुंतलासी भक्तीप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं तरियांत ॥१॥ कोठें सांदी कोंदी बिळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम