भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटिशा आदित्य गोठे एके ठायीं । तेजें दिशा दाही उजळल्या

kotisha aditya gothe eke thayin | tejen disha dahi ujalalya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोटिशा आदित्य गोठे एके ठायीं । तेजें दिशा दाही उजळल्या ॥१॥ घाबरा होवोनी वसुदेव पाहे । ह्लदयीं आश्चर्य करी-तसे ॥२॥ मुकुटावरी रत्न नक्षत्रांचा मेळा । भाळीं शोभे टिळा केश-राचा ॥३॥ व्यंकटा भृकुटी कमलाकार नेत्र । नासीक विचित्र शुक-चंचू ॥४॥ विद्युल्लते ऐसी झळकती कुंडलें । अधर कोंवळे अरुणोदय ॥५॥ कंबुग्रीव कंठ ह्लदयीं वत्सलांच्छन । ब्रह्मयाची सीण न कळे अंत ॥६॥ चतुर्भुज शंखचक्रगदापद्म । चिमणा मेघ:श्याम वर्ण ज्याचा ॥७॥ कौस्तुभ निर्भळ वैजयंती माळा । कासे सोनसळा हाटवर्ण ॥८॥ रुणझुण रुणझुण वाजताती वाळे । आरक्त वर्तुळ नखीं शोभा ॥९॥ ध्व-जवज्रांकुश जैसीं रातोत्पळें । नामा म्हणे डोळे दिपताती ॥१०॥