भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं

kothen deva alen anga thorapan | baren hoten din hoton tarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥ न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥ तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥