भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां

kothen amhi atan vechavi he vani | kon mana ani janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥ न करावी सांडी आतां टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥ध्रु.॥ घरोघरीं झाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडवी ॥२॥ तुका म्हणे आम्हां भाकितां करुणा। भलता चि शाहाणा शोध काढी ॥३॥