भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा । मान ईं सोज्वळा वर्णूं हरीचा

kokile chitkala ratnachi te kila | man in sojvala varnun haricha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा । मान ईं सोज्वळा वर्णूं हरीचा ॥१॥ वृंदावनीं वेणू वाजे रुणुझुणू । वेध तनुमनु गोपाळांचा ॥२॥ देहुडा पाउलीं हरि गोपाळा गोजिरीं । वाहाती ते लालोरी हरी छंदें ॥३॥ वेधलीं वनचरें गोधनें अपारें । पक्षीकुळें साचारें तल्लिन झालीं ॥४॥ यमुनेचें उदक जळचरें सम्यक । पाताळीं पन्नग एको ठेली ॥५॥ ऐसे कृष्ण वेधें तल्लिन झाले बोधें । नामा म्हणे वेणूछंदें स्थिर झाली ॥६॥