भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला

kothe guntalasi dvarakechya raya | vel kan sakhaya laviyela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥२॥ तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥